{"product_id":"chehra-mohra","title":"Chehra-Mohra | Chor Chor Chor: Two Plays in Marathi","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“दिलीप जगतापांनी जागतिक रंगभूमीवर गाजलेल्या नोबेल पुरस्कार प्राप्त नाटककारांची (उदा. बेकेट, सार्त्र, झ्ने, शोएंका, दारीओ फो) बरीच नाटकं मराठीत अनुवादित केली आहेत. कोणतीही नाट्यसंहिता लेखकाच्या मनोभूमीला रुचलेली व आपल्या लोकभूमीत रुजलेली असावी असे त्यांना वाटत आले आहे. त्या कलाकृतीचा मालक वेगळा असला तरी त्या अनुभवाचा प्रेषित म्हणून अनुवादकाचे स्वतंत्र असे व्यक्तीमत्त्व असावे असे त्यांना वाटत असावे. त्यात दोन्ही भाषांना त्यांच्या संस्कृतीला जोडता येणारा समांतर असा पुल निर्माण झाला पाहिजे. कोणत्याही अर्थाने देशीभवनाची अस्मिता जन्मायला नको. वैश्विक वाटाव्यात एवढ्या दोन्ही संस्कृतींशी सरमिसळ व्हायला हवी. आपण बदल करून कलेचा आत्मा गमावत नाही आहोत, त्याला लोकस्थितीशी जोडताना आत्म्याचा अवकाश अधिक व्यापक करीत असतो असे दिलीप जगतापांना वाटत असावे. त्यांच्या नाटकांसंबंधी माझा एक अनुभव आहे: मी शेक्सपिअरच्या ‘ज्युलियस सीझर’च्या बऱ्याच मराठी संहिता वाचलेल्या होत्या. त्यावरून ते नाटक कळले असे वाटत नव्हते, पण दिलीप जगतापांचे ‘ज्युलियस सीझर’ वाचताना त्यातील क्रायसिस उत्तमपैकी आकळला होता. म्हणजे जगतापांनी मराठीत आपला अनुवाद पोहचवण्याचा आपला म्हणून एक मार्ग निवडलेला आहे. म्हणून त्यांच्यातील सर्जनशीलतेला मराठी मानसिकतेचा, येथील मातीचा स्पर्श झालेला आहे.”\u003cbr\u003e\u003cstrong\u003eदा. गो. काळे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cem\u003eकवी, समीक्षक, संपादक\u003c\/em\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e~\u003cbr\u003e\u003cbr\u003eCover design: Elmar Kuiper\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e~\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eदिलीप जगताप\u003c\/strong\u003e, वाई, सातारा\u003cbr\u003e \u003cbr\u003e१) १९६८ : ‘वादळ’ या पहिल्या एकांकिकेला पुरुचेत्तम करंडक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक पारितोषिक.\u003cbr\u003e \u003cbr\u003e२) १९७० : ‘पिंजरा’ एकांकिकेला सांधिक सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा करंडक.\u003cbr\u003e \u003cbr\u003e३) १९७३ : ‘एक अंडे फुटले’ या पहिल्या नाटकाचे सत्यदेव दुबे यांनी आयोजित केलेल्या नाट्यकार्यशाळेत वाचन व चर्चा, याच शिबीरात महेश एलकुंचवार, गो. पु. देशपांडे, सतीश आळेकर, अच्युत वझे, शंकर शेष या नाटककारांनी त्यांच्या पहिल्यारहिल्या नाटकांचे वाचन केले.\u003cbr\u003e \u003cbr\u003e४) ‘एक अंडे फुटले’ राज्यनाट्यस्पर्धेत रंगभवन (मुंबई) केंद्रावर सादर. पारितोषिक पात्र ठरले. दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर, सहभाग : अमोल पालेकर, जयराम हार्डिकर, जनार्दन परब, मंगेश कुलकर्णी.\u003cbr\u003e \u003cbr\u003e५) १९७३ : याच वर्षी पुणे केंद्रातून ‘एक असतो राजा’ हे नाटक सादर. पारितोषिक पात्र. दिग्दर्शक : अनंत कान्हे, सहभाग: आनंद लागू.\u003cbr\u003e\u003cbr\u003e६) १९७४ : मुंबई केंद्रातून ‘बुडती हे जन’ व सांगली केंद्रातून ‘सस्ती गंमत’ प्रथम क्रमांक मिळवून अंतिम फेरीत दाखल. ‘बुडती हे जन’, दिग्दर्शक : विवेक लागू, सहभाग : विनय आपटे, ज्यूला देऊस्कर.\u003cbr\u003e \u003cbr\u003e७) १९७५ : ‘महाराजांच्या जयजयकार सांगली केंद्रात प्रथम सादरकर्ते: बाई कॉलेज सहभाग : सविता प्रभुणे, देवदत्त साबळे.\u003cbr\u003e \u003cbr\u003e८) १९७६ : शेक्सपिअरची नाटके ‘कोरियालेनल’ व ‘टेस्ट’ अनुक्रमे युनियन बँक व ‘उन्मेष’ यांनी सादर केली. दिग्दर्शक : विनय आपटे, जयराम हार्डिकर.\u003cbr\u003e \u003cbr\u003e१) यानंतर सात्याने ठाणे, पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, सांगली, कराड, कोल्हापूर, गोवा या केंद्रातून विविध संस्थांनी ‘क्षेत्रीय’, ‘चेटूकवारं’, ‘भूमिगत’, ‘बळ’, ‘नुसती गंमत’, ‘पक्षपात’, ‘आला रे राजा’, ‘रंगरंगीली’, ‘राजदंड’, ‘बे बे बकरी’, ‘सुदिन’, ‘एक तळ गाळात’, ‘पूज्य गुरुजी’, ‘सशक्त’, ‘जा खेळायला पळ’, ‘रंगे हात’, ‘काठपदर’, ‘दलदल’, ‘गस्त’, ‘महाराजा’, ‘बुडबुड रे घागरी, ‘नामाचा जाहिरनामा’ ही नाटके सादर केली. त्यातील अनेक पारिरिक पत्र ठरली आहेत.\u003cbr\u003e \u003cbr\u003e१०) शेक्सपिअरची ‘जूलियस सीझर’, ‘द टँपेस्ट’, ‘कोरियलेनस’, ‘ट्वेल्थ नाईट’ सह ज्यॉ पॉल सार्त्र, सॅम्युएल बेकेट, जॉईधझेन, वाले शोएन्का, दारिओ फो यांच्या कलाकृतीची भाषांतरे केली आहेत.\u003cbr\u003e \u003cbr\u003e११) ‘नामाचा जाहिरनामा’, ‘आला रे राजा’, ‘सशक्त’ या नाटकांना महाराष्ट्र शासनाची उत्कृष्ट लेखनाची पारितोषिके प्राप्त.\u003cbr\u003e \u003cbr\u003e१२) २०११: ‘जा खेळायला पळ’ या नाटकात ‘झी’ चे सर्वोत्कृष्ट प्रायोगिक लेखनाचे पारितोषिक.\u003cbr\u003e \u003cbr\u003e१३) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे, शांतिनिकेतन विद्यापीठ, सांगली व वसई येथे नाट्य महोत्सवाचे आयोजन, उपस्थिती डॉ. लागू, अमोल पालेकर, यमुनाताई बाईकर, महेश एलकुंचवार, सतीश आलेकर.\u003cbr\u003e \u003cbr\u003e१४) व्यावसायिक राज्यनाट्यस्पर्धा, पुरुषोत्तम करंडक (अंतिम फेरी) व राज्यातील अनेक ठिकाणी परीक्षक.\u003cbr\u003e \u003cbr\u003e१५) साहित्य आणि संस्कृती मंडळ, सदस्य (२००८)\u003cbr\u003e \u003cbr\u003e१६) वाई येथून सातत्याने नाट्यनिर्मिती.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e~\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eDRAMA (Marathi)\u003cbr\u003eISBN 978-81-974464-8-1\u003cbr\u003eHardcover\u003cbr\u003e152 pages\u003cbr\u003e216 mm × 140 mm\u003cbr\u003eMarch 2026 \u003c\/p\u003e","brand":"Copper Coin","offers":[{"title":"Default Title","offer_id":54928287793443,"sku":"TSK2026","price":10.0,"currency_code":"USD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0813\/7166\/0579\/files\/ChehraMohra_frontcover.jpg?v=1776190369","url":"https:\/\/200911-2.myshopify.com\/products\/chehra-mohra","provider":"Copper Coin","version":"1.0","type":"link"}