Tirthakshetra: Five Plays in Marathi
Tirthakshetra: Five Plays in Marathi
Couldn't load pickup availability
“दिलीप जगताप यांची नाटके ‘कॉपर कॉईन’तर्फे येताहेत ही एक आनंदाची बातमी. साठोत्तरी नाटककारांच्या नंतर मराठीत सत्तरत्तरी नाटककारांची एक पिढी पुढे आली ज्यांनी विजय तेंडुलकर, चि. त्र्यं. खानोलकर यांच्यांनतर मराठी नाटकाचा वारसा पुढे नेला. त्यात वृंदावन दंडवते, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, अच्युत वझे ह्यांच्या तोडीस तोड काम केले ते दिलीप जगताप यांनी. त्यांचा नाट्यप्रवास अस्सल ग्रामीण इथॉसला सहज पेलत, अस्तित्त्ववादाला इंडियन सिच्युएशनची ॲब्सर्डिटी पुरवत झालेला एक उत्कट सोहळा आहे. प्लॉटविरहित बांधणी हे ॲब्सर्ड नाटकाचे वैशिष्ट्य त्यांच्या नाटकात प्रगटत राहिलं. तेंडुलकरांना प्लॉटला कधीच पूर्ण तिलांजली देता आली नाही. काहीवेळा तर आळेकरही प्लॉटबद्ध लिहीत राहिले, पण जगतापांनी त्यावर मात करण्याचा जेन्युईन प्रयत्न केला. दुर्दैवाने मराठीतील अकादमीक लोकांना त्यांची अचिव्हमेंट दिसली नाही. ते आणि वृंदावन दंडवते दोघेही मराठी नाटकातील देशीवादाचे उत्तम उदाहरण. मी ज्या देशीवादाला अस्तित्वकेंद्री देशीवाद म्हणतो त्याची सुरुवात चित्रे, कोलटकर यांच्या कविता, नेमाडेंची ‘कोसला’ व भाऊ पाध्येंची ‘वासूनाका’ आणि तेंडुलकरांचे ‘घाशीराम कोतवाल’ पासून होते. पुढे नेमाडे वास्तववादाकडे वळल्याने समस्त देशीवादी चळवळ वास्तववादी होत गेली आणि अस्तित्वकेंद्री देशीवाद मागे पडला. त्याचा फटका विलास सारंग, दिलीप जगताप आणि वृंदावन दंडवते ह्यांना बसला. असो. दिलीप जगतापांची ‘देर आये दुरुस्त आये’ म्हणत आता नाटके छापून येत आहेत त्यांचे स्वागत. आता तरी जगतापांना न्याय मिळेल ही अपेक्षा.”
श्रीधर तिळवे नाईक
कवी, समीक्षक
~
Cover design: Elmar Kuiper
~
दिलीप जगताप, वाई, सातारा
१) १९६८ : ‘वादळ’ या पहिल्या एकांकिकेला पुरुचेत्तम करंडक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक पारितोषिक.
२) १९७० : ‘पिंजरा’ एकांकिकेला सांधिक सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा करंडक.
३) १९७३ : ‘एक अंडे फुटले’ या पहिल्या नाटकाचे सत्यदेव दुबे यांनी आयोजित केलेल्या नाट्यकार्यशाळेत वाचन व चर्चा, याच शिबीरात महेश एलकुंचवार, गो. पु. देशपांडे, सतीश आळेकर, अच्युत वझे, शंकर शेष या नाटककारांनी त्यांच्या पहिल्यारहिल्या नाटकांचे वाचन केले.
४) ‘एक अंडे फुटले’ राज्यनाट्यस्पर्धेत रंगभवन (मुंबई) केंद्रावर सादर. पारितोषिक पात्र ठरले. दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर, सहभाग : अमोल पालेकर, जयराम हार्डिकर, जनार्दन परब, मंगेश कुलकर्णी.
५) १९७३ : याच वर्षी पुणे केंद्रातून ‘एक असतो राजा’ हे नाटक सादर. पारितोषिक पात्र. दिग्दर्शक : अनंत कान्हे, सहभाग: आनंद लागू.
६) १९७४ : मुंबई केंद्रातून ‘बुडती हे जन’ व सांगली केंद्रातून ‘सस्ती गंमत’ प्रथम क्रमांक मिळवून अंतिम फेरीत दाखल. ‘बुडती हे जन’, दिग्दर्शक : विवेक लागू, सहभाग : विनय आपटे, ज्यूला देऊस्कर.
७) १९७५ : ‘महाराजांच्या जयजयकार सांगली केंद्रात प्रथम सादरकर्ते: बाई कॉलेज सहभाग : सविता प्रभुणे, देवदत्त साबळे.
८) १९७६ : शेक्सपिअरची नाटके ‘कोरियालेनल’ व ‘टेस्ट’ अनुक्रमे युनियन बँक व ‘उन्मेष’ यांनी सादर केली. दिग्दर्शक : विनय आपटे, जयराम हार्डिकर.
१) यानंतर सात्याने ठाणे, पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, सांगली, कराड, कोल्हापूर, गोवा या केंद्रातून विविध संस्थांनी ‘क्षेत्रीय’, ‘चेटूकवारं’, ‘भूमिगत’, ‘बळ’, ‘नुसती गंमत’, ‘पक्षपात’, ‘आला रे राजा’, ‘रंगरंगीली’, ‘राजदंड’, ‘बे बे बकरी’, ‘सुदिन’, ‘एक तळ गाळात’, ‘पूज्य गुरुजी’, ‘सशक्त’, ‘जा खेळायला पळ’, ‘रंगे हात’, ‘काठपदर’, ‘दलदल’, ‘गस्त’, ‘महाराजा’, ‘बुडबुड रे घागरी, ‘नामाचा जाहिरनामा’ ही नाटके सादर केली. त्यातील अनेक पारिरिक पत्र ठरली आहेत.
१०) शेक्सपिअरची ‘जूलियस सीझर’, ‘द टँपेस्ट’, ‘कोरियलेनस’, ‘ट्वेल्थ नाईट’ सह ज्यॉ पॉल सार्त्र, सॅम्युएल बेकेट, जॉईधझेन, वाले शोएन्का, दारिओ फो यांच्या कलाकृतीची भाषांतरे केली आहेत.
११) ‘नामाचा जाहिरनामा’, ‘आला रे राजा’, ‘सशक्त’ या नाटकांना महाराष्ट्र शासनाची उत्कृष्ट लेखनाची पारितोषिके प्राप्त.
१२) २०११: ‘जा खेळायला पळ’ या नाटकात ‘झी’ चे सर्वोत्कृष्ट प्रायोगिक लेखनाचे पारितोषिक.
१३) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे, शांतिनिकेतन विद्यापीठ, सांगली व वसई येथे नाट्य महोत्सवाचे आयोजन, उपस्थिती डॉ. लागू, अमोल पालेकर, यमुनाताई बाईकर, महेश एलकुंचवार, सतीश आलेकर.
१४) व्यावसायिक राज्यनाट्यस्पर्धा, पुरुषोत्तम करंडक (अंतिम फेरी) व राज्यातील अनेक ठिकाणी परीक्षक.
१५) साहित्य आणि संस्कृती मंडळ, सदस्य (२००८)
१६) वाई येथून सातत्याने नाट्यनिर्मिती.
~
DRAMA (Marathi)
ISBN 978-81-974464-8-1
Hardcover
152 pages
216 mm × 140 mm
March 2026
Share
