Skip to product information
1 of 1

Yedyapiracha Bedapaar | Gela Bazaar: Two Plays in Marathi

Yedyapiracha Bedapaar | Gela Bazaar: Two Plays in Marathi

Regular price $10.00 USD
Regular price $18.00 USD Sale price $10.00 USD
Sale Sold out

नाटककार केवळ नाटककार नसतो, तो एक विचारवंत अन समीक्षकही असतो. राजकारण, अर्थकारण आणि तत्त्वकारण या मुख्य तीन ‘करण’ उर्फ अवयवांनी जो समाज घडत असतो त्याची सखोल जाण असणारा विचारवंत असतो. नाटकातील कलावंत, नेपथ्यकार, आणि प्रेक्षक यांच्यापर्यंत ही जाण प्रवाहित करण्याचे त्याचे सामर्थ्य असते.

राज्यशास्त्र या विषयाचे अध्ययन आणि नंतर अध्यापन यांची जोड मिळून दिलीपची ‘बहुजन हिताय’ केंद्रित राजकीय आणि सामाजिक दृष्टी दिलीपला ‘नाटककार विचारवंत’ दर्जा मिळवून देते. ही दृष्टी दिलीपच्या समग्र नाट्य कृतींमधून जाणवते आणि ती अधिक गतिशील होत जाते, याचा पुरावा त्याच्या प्रत्येक नाट्य कृतीतून ठळकपणे जाणवतो.

दिलीप गेली ५० वर्षे नाटक करतो आहे. ‘करतो आहे’ हे सर्वार्थाने ‘सार्थ वचन’ आहे. नाटक मनात-बुद्धीत घुमत राहणे, प्रत्यक्षात ती नाटके लिहिणे, ती रचणे-दिग्दर्शित करणे, प्रयोग करणे, त्यावर साधकबाधक चर्चा करणे – सारा नाट्य संसार चालवणे इत्यादी करणे म्हणजे ‘नाटक करणे’. गेली पन्नास वर्षे अखंडपणे केवळ ‘नाटक जगणाऱ्या’ दिलीपने एकांकिका ते पूर्ण नाटक, स्वलिखित ते अनुवादित अशा जवळपास ४० नाट्य संहिता रचल्या. मराठी रंगभूमीच्या इतिहासात समांतर रंगभूमीच्या समीक्षेला दिशा दर्शक ठरतील अशा त्याच्या संहिता, हे योगदान मराठी सारस्वताच्या पटलावर मांडण्याची संधी ‘कॉपर कॉईन’ला मिळाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आणि ते मराठी वाचकवर्गाला, रंगकर्मींना बहाल केल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

श्रीनिवास हेमाडे
लेखक, व्यावसायिक तत्त्ववेत्ता


~

Cover image: Elmar Kuiper

~

दिलीप जगताप, वाई, सातारा
 
१) १९६८ : ‘वादळ’ या पहिल्या एकांकिकेला पुरुचेत्तम करंडक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक पारितोषिक.
 
२) १९७० : ‘पिंजरा’ एकांकिकेला सांधिक सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा करंडक.
 
३) १९७३ : ‘एक अंडे फुटले’ या पहिल्या नाटकाचे सत्यदेव दुबे यांनी आयोजित केलेल्या नाट्यकार्यशाळेत वाचन व चर्चा, याच शिबीरात महेश एलकुंचवार, गो. पु. देशपांडे, सतीश आळेकर, अच्युत वझे, शंकर शेष या नाटककारांनी त्यांच्या पहिल्यारहिल्या नाटकांचे वाचन केले.
 
४) ‘एक अंडे फुटले’ राज्यनाट्यस्पर्धेत रंगभवन (मुंबई) केंद्रावर सादर. पारितोषिक पात्र ठरले. दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर, सहभाग : अमोल पालेकर, जयराम हार्डिकर, जनार्दन परब, मंगेश कुलकर्णी.
 
५) १९७३ : याच वर्षी पुणे केंद्रातून ‘एक असतो राजा’ हे नाटक सादर. पारितोषिक पात्र. दिग्दर्शक : अनंत कान्हे, सहभाग: आनंद लागू.

६) १९७४ : मुंबई केंद्रातून ‘बुडती हे जन’ व सांगली केंद्रातून ‘सस्ती गंमत’ प्रथम क्रमांक मिळवून अंतिम फेरीत दाखल. ‘बुडती हे जन’, दिग्दर्शक : विवेक लागू, सहभाग : विनय आपटे, ज्यूला देऊस्कर.
 
७) १९७५ : ‘महाराजांच्या जयजयकार सांगली केंद्रात प्रथम सादरकर्ते: बाई कॉलेज सहभाग : सविता प्रभुणे, देवदत्त साबळे.
 
८) १९७६ : शेक्सपिअरची नाटके ‘कोरियालेनल’ व ‘टेस्ट’ अनुक्रमे युनियन बँक व ‘उन्मेष’ यांनी सादर केली. दिग्दर्शक : विनय आपटे, जयराम हार्डिकर.
 
१) यानंतर सात्याने ठाणे, पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, सांगली, कराड, कोल्हापूर, गोवा या केंद्रातून विविध संस्थांनी ‘क्षेत्रीय’, ‘चेटूकवारं’, ‘भूमिगत’, ‘बळ’, ‘नुसती गंमत’, ‘पक्षपात’, ‘आला रे राजा’, ‘रंगरंगीली’, ‘राजदंड’, ‘बे बे बकरी’, ‘सुदिन’, ‘एक तळ गाळात’, ‘पूज्य गुरुजी’, ‘सशक्त’, ‘जा खेळायला पळ’, ‘रंगे हात’, ‘काठपदर’, ‘दलदल’, ‘गस्त’, ‘महाराजा’, ‘बुडबुड रे घागरी, ‘नामाचा जाहिरनामा’ ही नाटके सादर केली. त्यातील अनेक पारिरिक पत्र ठरली आहेत.
 
१०) शेक्सपिअरची ‘जूलियस सीझर’, ‘द टँपेस्ट’, ‘कोरियलेनस’, ‘ट्वेल्थ नाईट’ सह ज्यॉ पॉल सार्त्र, सॅम्युएल बेकेट, जॉईधझेन, वाले शोएन्का, दारिओ फो यांच्या कलाकृतीची भाषांतरे केली आहेत.
 
११) ‘नामाचा जाहिरनामा’, ‘आला रे राजा’, ‘सशक्त’ या नाटकांना महाराष्ट्र शासनाची उत्कृष्ट लेखनाची पारितोषिके प्राप्त.
 
१२) २०११: ‘जा खेळायला पळ’ या नाटकात ‘झी’ चे सर्वोत्कृष्ट प्रायोगिक लेखनाचे पारितोषिक.
 
१३) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे, शांतिनिकेतन विद्यापीठ, सांगली व वसई येथे नाट्य महोत्सवाचे आयोजन, उपस्थिती डॉ. लागू, अमोल पालेकर, यमुनाताई बाईकर, महेश एलकुंचवार, सतीश आलेकर.
 
१४) व्यावसायिक राज्यनाट्यस्पर्धा, पुरुषोत्तम करंडक (अंतिम फेरी) व राज्यातील अनेक ठिकाणी परीक्षक.
 
१५) साहित्य आणि संस्कृती मंडळ, सदस्य (२००८)
 
१६) वाई येथून सातत्याने नाट्यनिर्मिती.

~

DRAMA (Marathi)
ISBN 978-81-974464-8-1
Hardcover
152 pages
216 mm × 140 mm
March 2026 

View full details